सखींनो, नैराश्यापासून सुटका मिळवण्यासाठी करा 'या' ८ गोष्टी - ( How to get rid of Depression)
महिला ही आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ असते. सकाळी उठल्यापासून घरातील सर्व कामे उरकून नोकरीही करायची असते. त्यातच मुलांची शाळा, मुलांचा अभ्यास,त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे असतात.तसेच इतर नाती जपून पुढे जायचे असते. त्यामुळे ती strong व सशक्त असणे गरजेचे आहे परंतु या धकाधकीच्या जीवनात महिलांच्या आयुष्यात "नैराश्य"म्हणजेच डिप्रेशन नावाचा मानसिक आजार डोके वर काढत आहे. मुलींना लग्न जमत नाही म्हणून तर महिलांना लग्नानंतर तोंड द्यावे लागणाऱ्या अडचणींमुळे नैराश्य येते.
आज नैराश्य हे लहान मुले, पुरुष, वृद्ध महिला सगळ्यांनाच येत असते परंतु पुरुषांपेक्षा महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आहे.
कधी कधी असं होतं काहीच आवडेनासे होते.सगळे असूनही आनंद मात्र नसतो.कसला तरी सतत विचार चालू असतो,कसली तरी चिंता भेडसावत असते.कधीकधी भीती वाटत असते पण हे सगळं का होतंय, कशामुळे होते हे मात्र कळत नाही. काय करावे आणि काय करू नये हा एकच प्रश्न सतावत असतो. सखींनो तुम्हांलाही अशी समस्या जाणवत असेल तर..
काही गोष्टी ज्या तुम्हाला नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करतील आणि तुमचा आनंद परत तुम्हाला मिळवून देतील...
1. नाचा,गाणे गा किंवा गाणे ऐका :-
नैराश्यातून बाहेर निघण्याचा सर्वात सोपा आणि जालीम उपाय म्हणजे "Music". मग त्यात Silent songs असतील Romantic songs असतील किंवा लतादीदी,किशोर दा यांची Evergreen songs असतील. पण हो जी गाणी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतील तीच गाणी शक्यतो ऐका.मनावरील निम्मे ओझे गाणे ऐकल्याने कमी होते.
'गाता रहे मेरा दिल' पासून 'जिने के है चार दिन' पर्यंत सकारात्मक विचार निर्माण करणारी अनेक गाणी आहेत ती गुणगुणावीत.अरुण दाते यांचे एक सुंदर रचना असलेले 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' हे गाणे जगण्याची नवी उमेद देते. त्यामुळे आवाज जरी चांगला नसेल तरी गाण्याचा आनंद घ्या.😊 संगीत नकारात्मकतेला बाजूला सारते. अजून एक पर्याय म्हणजे नृत्य.लावा एखादे आवडीचे गाणे आणि बेभान होऊन नाचा.खूप आनंद मिळेल.कारण Music have power to change your mind & mood. enjoy it.
2. कधीतरी लहान होऊन पहा :-
डिप्रेशन असले की मूड कधी चांगला राहत नाही, तेव्हा मुलांबरोबर त्यांच्या वयात जाऊन खेळा,मस्ती करा.सोबत cartoon Network वर एखादे cartoon पहा.लहानपणीच्या आठवणी जाग्या होतील.आंधळी कोशिंबीर,कॅरम,सापशिडी असे indoor गेम्स खेळून पहा नक्की मदत होईल.
3.आवडणाऱ्या गोष्टींची यादी करा :-
अशा अनेक गोष्टी असतात ज्या रोजच्या धावपळीत आपण विसरून गेलेलो असतो त्यांची लिस्ट बनवा.त्यातून तुम्हांला कळेल तुम्हाला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून मागे सुटल्या आहेत.तुम्हाला काय आवडतं जे तुम्ही केलं पाहिजे ते त्यातून कळेल.
" जब हम खुद को समझ लेते है ना तब और कोई हमारे बारे में क्या सोचता है फरक नही पडता"
4. निसर्गाच्या सानिध्यात जा :-
जेव्हा आपल्याला वाटतं की काही चांगलं होत नाहीये,काय करावं कळत नाही,घराबाहेर पडा, झाडांच्या सहवासात जा.निसर्गातील पाने, फुले तुम्हाला बोलवत आहेत असे वाटेल झाडां सारखा दुसरा मित्र नाही त्यांच्या सानिध्यात योगा करा,व्यायाम करा नक्की आनंद मिळेल.मग पहा मनाचे दरवाजे उघडतील आणि समाधानाची ताजी हवा मिळेल जी आयुष्य सुंदर बनवेल.जे तुम्हाला सापडत नव्हतं ते सापडेल.
5. क्रिएटिव्हिटीशी मैत्री :- (Be creative)
रंगांशी मैत्री करा मग ते रांगोळीचे असतील किंवा चित्रातील.नैराशेतून मुक्तता मिळवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. पहा हि रंगांची संगत तुमच्या आयुष्यातही वेगवेगळे सकारात्मकतेचे रंग भरतील.वेगवेगळ्या कल्पनांची सांगड घालून ब्रेनला चालना देऊन नवीन काहीतरी बनविण्याचा प्रयत्न करा.आपले छंद जोपासा. वेगवेगळ्या रेसिपीज मधून टेस्टी डिशेश बनवा आणि घरच्यांना खाऊ घाला.काहीही करा परंतु नवीन काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करा.
6. नैराश्य युक्त मनाचा ऐकू नका :-
'नाही' या शब्दांना आपल्या डिक्शनरी मधून काढून टाका. निराश असलेले मन जे सांगते आहे त्याकडे दुर्लक्ष करा.बरोबर त्याविरुद्ध करा. उदाहरणार्थ घरातच बसून राहावं कुठे जाऊ नये असं वाटत असेल तर हमखास शॉपिंगला जा, एखाद्या मुव्हीला जा,फिरायला जा. करण्यासारखं खूप आहे.निराशेतून बाहेर पडता येईल पण आधी स्वतःला जागे करा.
7. मैत्रिणींमध्ये वेळ घालवा :-
आपल्या आयुष्यात आपल्या जवळच्या अशा मैत्रिणींचा ग्रुप हा नक्की असतो. त्यांच्याबरोबर छोटीशी ट्रीप काढा,मनमोकळे हसा,मनमोकळ्या गप्पा मारा.मैत्रिणींमध्ये Best अशी एकच मैत्रीण असते तिच्याजवळ बोलुन आपल्या मनावरील ओझे हलके करा.परंतु यातही अजून डिप्रेशनमध्ये घालणाऱ्या मैत्रिणी पासून थोडे लांबच राहा.
8.आपल्या सद्यस्थितीचा स्वीकार करा :-
माझ्या आयुष्यातील तणाव तुम्हाला कळणार नाही असे बोलून चालणार नाही.माझ्या आयुष्यात जे आहे ते आहे माझी परिस्थिती बदलण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे असे स्वतःला सांगा.परिस्थिती तेव्हाच बदलेल जेव्हा तुमच्यात परिवर्तन होईल.म्हणुन जास्तीत जास्त आनंदी रहाण्याचा प्रयत्न करा.
जर वरील गोष्टींमुळे काही फरक पडत नसेल तर ही समस्या गंभीर असू शकते. नेहमीच निरुत्साही वाटत असेल,काहीच करण्याची इच्छा होत नसेल तर वेळेस तपासणी करून घेऊन औषधे घ्या,मेडिटेशन करा दुर्लक्ष करू नका.
सखींनो स्वतःला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा.कारण " जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही" सदैव आनंदी राहा,हसत राहा मुक्त पक्षाप्रमाणे स्वच्छंद विहार करा व आकाशाला गवसणी घाला.म्हणजे Depression ची समस्याच उद्भवणार नाही🤗

0 Comments