स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे तुमच्यात तर नाहीत ना ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
आज जगातील महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात वाढत जाणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग (Breast cancer).महिलांमध्ये होणारा हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन (NICPR) च्या अहवालानुसार आपल्या देशात या केसेस जलद गतीने वाढत आहेत खरे पाहता वयाची 45 वर्षे पार केलेल्या महिलांमध्ये ही समस्या सर्वात जास्त दिसते परंतु आता वयाच्या तिशीनंतरच याचा धोका वाढत चालला आहे.याच्या संकेतांविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. प्रथमतः आपण हा कॅन्सर कशामुळे होतो ते पाहू.
स्तनाचा कर्करोगाची लक्षणे तुमच्यात तर नाहीत ना ?
स्तनाच्या कर्करोगाची प्रमुख कारणे :-
1.अनुवंशिक कारणांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.2.वयाच्या १२व्या वर्षापूर्वीच मासिक पाळी सुरू झाली असल्यास. (Early Periods)
3.वयाच्या ५५व्या वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यास. (Late Periods)
4.कुटुंबनियोजन औषधांच्या अतिरेकाने. Contraceptive Pills
5.व्यसानाधिनतेमुळे.
6.लठ्ठपणा असलेल्या महिला, (Obesity & Cancer Risk) अधिक चरबीयुक्त, स्नेहयुक्त आहाराचे सेवन करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
स्तनाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण म्हणजे बदलत चाललेली जीवनशैली. आजच्या महिला नोकरी करत आहेत,स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. त्यांच्यातील गृहिणीत्व कमी होऊन त्या कार्यशील झालेल्या आहेत.त्यामुळे कुटुंब पद्धतीतही बदल झालेले आहेत.लहान कुटुंब ठेवण्यासाठी दोन पेक्षा जास्त संतती जन्माला घालण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी स्तनपान (Breastfeeding) कमी झालेले आहे स्तनपान हे कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह (Cancer Preventive)असते त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.
जागतिक पातळीवर अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण १० टक्के आहे. स्तनामधील पेशींची वाढ जेव्हा नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा स्तनाचा कॅन्सर होतो. स्तनाच्या कॅन्सरची सुरुवात ही स्तनापासून सुरू होत असली, तरी स्तनाच्या बाहेर जाऊन रक्तवाहिन्या किंवा लसिकांमध्ये (लिम्फ वेसल्स) याचा फैलाव होऊ शकतो.
स्तनाच्या कर्करोगाची प्रमुख लक्षणे :-
1.स्तनाच्या ठिकाणी कठीणपणा किंवा गाठ येणे.(न दुखणारी)2.स्तनाच्या ठिकाणी सूज किंवा बारीक खळगा पडणे.
3.स्तनाच्या ठिकाणी न थांबणारी खाज.
4.स्तनाग्र किंवा त्याच्या बाजूच्या भागात पांढरेपणा किंवा तांबूसपणा.
5.स्तनाच्या आकारात लक्षणीय बदल.
6.स्तनाग्रातून स्राव वाहणे.
7.स्तनामध्ये वेदना होणे.
स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक लक्षण म्हणजे न दुखणारी गाठ. बर्याच महिला गाठ दुखत नाही म्हणून दुर्लक्ष करतात.ते चुकीचे आहे ही गाठ हळूहळू वाढत जाते.तीचा काहीही त्रास नसतो. काहीवेळा स्त्रियांना वाटते ती दुधाची गाठ आहे, राहून जाईल म्हणून त्या डॉक्टरांना दाखवत नाही परंतु न दुखणारी गाठ त्वरित दाखवणे आवश्यक आहे.दुखणारी गाठ जंतूंची असू शकते,त्यामुळे ती साधी असते. साध्या उपायांनी ती बरी होते.
Courtesy- Visual.ly/health
निदानासाठी आवश्यक तपासण्या :-
1.मॅमोग्राफी : ( Mammography Test) या तपासणीमध्ये क्ष-किरणांनी ( X-Ray) स्तनांची आतील रचना सुस्पष्ट करून दाखविण्याचे काम केले जाते. स्त्रियांनी चाळीशीनंतर वैद्यकीय सल्ल्याने ही तपासणी करून घेणे योग्य ठरते.2.बायॉप्सी : (Biopsy Test) यामध्ये गाठीचा एखादा छोटा भाग काढून घेऊन त्याचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली परीक्षण केले जाते.
3.रक्तपरीक्षण : (Blood Test) संपूर्ण ब्लड काऊंट तपासणे.
4. ER-PR Test- Estrogen Receptors - Progesterone Receptors
Key Points-
1. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर्स स्तन कर्करोगाच्या पेशींमध्ये आढळतात जे वाढत्या प्रमाणात ऍस्ट्रोजेन आणि संबंधित संप्रेरकांवर अवलंबून असतात.
2. आक्रमक स्तनाचा कर्करोग किंवा स्तनाच्या कर्करोगाच्या पुनरावृत्ती असलेल्या सर्व रूग्णांनी त्यांचे ट्यूमर एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर्ससाठी चाचणी केली पाहिजेत.
- 3. ही चाचणी एका मान्यताप्राप्त प्रयोगशाळेद्वारे केली पाहिजे जी विशिष्ट चाचणी प्रक्रियांचे अनुसरण करते आणि सॅम्पलचे निरंतर रुपांतर करते.
ईआर- पी आर पॉजिटिव्ह / निगेटिव्ह म्हणजे काय ?
स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये एस्ट्रोजेन रिसेप्टर्स असल्यास, कर्करोगाला ईआर-पॉजिटिव स्तनाचा कर्करोग म्हणतात. स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींना प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर्स असल्यास, कर्करोगाला पीआर-पॉजिटिव्ह ब्रेस्ट कर्करोग म्हणतात. जर या पेशींमध्ये यापैकी दोन रिसेप्टर्स नाहीत तर कर्करोगाने ER / PR-negative असे म्हटले जाते. हार्मोन रेसेप्टर-सकारात्मक स्तन कर्करोग. सुमारे 80% सर्व स्तन कर्करोग "ईआर-पॉजिटिव्ह" असतात. याचा अर्थ हार्मोन एस्ट्रोजेनच्या परिणामात कर्करोगाच्या पेशी वाढतात. ... ER / PR-पॉझिटिव्ह ट्यूमर हे ER / PR-negative असलेल्या ट्यूमरपेक्षा होर्मोन थेरपीला प्रतिसाद देण्याची अधिक शक्यता असते.
स्तनाच्या कर्करोगाच्या अवस्था :- Stages of Breast Cancer- (0 to IV)
निदान झाल्यानंतर कर्करोगाची गाठ कोणत्या स्टेज मध्ये आहे ते पाहणे आवश्यक असते.
•स्टेज 0 :- DCIS & LCIS- "Ductal Carcinoma in Situ & Lobular Carcinoma in Situ"यामध्ये दुध बनवणाऱ्या ऊती किंवा नलिकांपर्यंतच गाठ मर्यादित असते इतर भागांमध्ये तिचा प्रसार झालेला नसतो साधारणत दोन ते चार सेंमी ची गाठ आढळून येते.
•स्टेज । :- "Localized- Invasive Breast Cancer"
वरील ऊती हळूहळू वाढू लागतात आणि त्या सभोवतालच्या निरोगी ऊतींना प्रभावित करतात. ही गाठ स्तनाच्या फॅटी ऊतींमध्ये पसरली जाऊ शकते.स्तनाच्या काही ऊती जवळच्या लिंफ नोडमध्ये(लसिका गाठी)पोचू शकतात.
•स्टेज ।। :- "Stage IIA & Stage IIB"- Early Locally Advanced
या स्टेजमध्ये कर्करोगाची लक्षणीय वाढ होते किंवा तो इतर भागांमध्ये पसरलेला असतो. उदाहरणार्थ बगले मध्ये गाठ लागणे.
•स्टेज ।।। :- "Stage IIIA & Stage IIIB, Stage IIIC" Late Locally Advanced
स्तनाच्या वरील चमडी मध्ये जर आजार गेलेला असेलअसेल व बगले मधील गाठी फिक्स झालेल्या असतील तर ती ही स्टेज असते.व यात उपचार करणे कठीण होते.
•स्टेज IV :- "Metastasized Cancer"
स्तन आणि बगलेच्या पलीकडे पेशींच्या अंतर्गत इतर भागांमध्ये जर हा कर्करोग पसरला असेल तर ही शेवटची अवस्था असते.
पहिल्या स्टेजमध्येच उपचार सुरू केला तर पेशंट बरा होण्याची शक्यता ८० टक्क्यांपेक्षा जास्त असते. दुसऱ्या स्टेजमध्ये इलाज सुरू झाल्यावर ६०-७० टक्के महिला ठीक होतात.
तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये याची माहिती मिळाल्यावर ही समस्या नियंत्रणात ठेवणे खूप अवघड होते.
अवस्थेनुसार उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्या पुढील प्रमाणे :-
1) शस्त्रक्रिया करून कर्करोग काढून टाकणे.
2) कर्करोग झालेल्या भागावरती विकिरणोपचार करणे (Radiation Therapy)
3) रसायन शास्त्रानुसार औषधोपचार व विकिरणोपाचर करणे (Chemotherapy - Radiation Therapy)
4) संप्रेरक औषधोपचार (Hormonal Therapy)
वरीलपैकी कोणती उपचार पद्धती रुग्णास योग्य आहे हे कर्करोग तज्ज्ञ ठरवतात आणि योग्य उपचार करतात.वैद्यकीय शास्त्रानुसार कर्करोग झालेला भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकणे ही उपचारपद्धती रुग्णास जास्त फायद्याची असल्याचे सिद्ध झाले आहे.
•स्तनाच्या कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया करण्याच्या प्रमुख दोन पद्धती आहेत :-
1) एमआरएम (MODIFIED RADICAL MASTECTOMY):- यामध्ये कर्करोग झालेले स्तन आणि त्या बाजूच्या काखेतील गाठी पूर्णपणे काढून टाकल्या जातात.2) बीसीटी (BREAST CONSERVATIVE THERAPY):- यामध्ये स्तनाचा फक्त कर्करोग काढला जातो आणि त्याबरोबर काखे गाठी काढल्या जातात, आणि स्तनाचा निरोगी भाग आहे तसाच ठेवला जातो.
वीस वर्षांवरील सर्व महिलांनी ‘ सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशन ("Self Breast Examination"), म्हणजेच स्तनाची स्वतः तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा स्तनातून कोणत्याही प्रकारचा स्राव होतो आहे का याकडे लक्ष देणे गरजेचे असते. मासिक पाळीनंतर सातव्या दिवशी ही तपासणी करावयाची असते. चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशनच्या जोडीने वर्षातून एकदा ‘ मॅमोग्राम ’ करून घेणे गरजेचे आहे. ज्या महिलांची मासिक पाळी बंद झाली असेल त्यांनी महिन्याच्या एका ठराविक तारखेला ब्रेस्ट एग्झॅमिनेशन करणे आवश्यक आहे.
स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा सूज आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.वेळीच उपचार घ्या.स्वस्थ रहा,निरोगी रहा.
Important Links-
Breast Cancer Hospital In IndiaCost of Breast Cancer Treatment- Lowest Cost options
How to get funds for Breast Cancer Treatment
Also Read..
महिलांमध्ये का वाढतेय PCOD / PCOS चे प्रमाण? त्यासाठी करा हे उपायनैराश्यापासून सुटका मिळवण्यासाठी करा 'या' ८ गोष्टी


