सखींनो स्वतःवर प्रेम करा,आपल्यातील स्व:ला जागृत करा. Inspire You to Be Yourself - Renew Your Mind | How to overcome negative emotions
आजकाल सोशल मीडियाचा वापर म्हणजे आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडियावर अनेकदा आपल्या मैत्रिणीकडून फिरायला गेलेले,कोणतेतरी function अटेंड केलेले फोटोज शेअर केले जातात. त्या माध्यमातून त्या किती आनंदी आहेत ते दाखवले जाते.आपल्या आयुष्यात असा क्षण अनुभवायला येत नसेल तर मन दुःखी होते.मग नको ते negative विचार मन करायला लागते. समोरच्याच्या सुखाचा आनंदाचा हेवा वाटू लागतो. काश आपल्यालाही कुठेतरी जाता आले असते,आपणही costly कपडे घालून एखादं फंक्शन अटेंड केलं असतं असे सतत वाटू लागते.पण सखींनो सोशल मीडियावर फोटोज टाकणे म्हणजे आनंद नव्हे. काही वेळा एखादी दुसरी टाकते म्हणून दाखवण्यासाठी फोटो टाकले जातात किंवा स्वतःचे दुःख लपवण्यासाठीही टाकले जातात त्यामुळे आपण नाराज होण्याची गरज नाही.
बहुतेकदा असं होतं महिलांच्या निरीक्षण शक्तीतून जाता-जाता एखादी महिला दिसली की तिने काय ज्वेलरी घातली आहे?ती तीला कशी वाटते?अशी आपण आधी पाहिली आहे का?मला ती कशी दिसेल? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. मग आपल्याकडे ही तशीच असावी असा अट्टहास सुरू होतो. दुसरी करते,दुसरी वापरते,म्हणून आपणही त्याच गोष्टी वापराव्यात,कराव्यात अशी फारशी काही गरज मला वाटत नाही आपल्याकडे जे आहे त्यात आपण जसे दिसतो तसेच स्वतःला स्वीकारा.
महिलांच्या मनात अनेकदा न्यूनगंडाची भावना दिसून येते,कुणीतरी गरीब असेल किंवा आजकालच्या zero figure च्या जमान्यात कोणीतरी तब्येतीने जास्त असेल तर माणसांमध्ये वावरताना सतत असे वाटत राहते की,लोक आपल्याकडे पाहून आपल्या राहणीमानावर टीका करत असतील,आपल्यावर हसत असतील त्यामुळे अनेकदा महिला खूलून व्यक्त होत नाहीत.
"Any women who understands the problems of running a home will be nearer to understanding the problems of running a country" Margaret Thatcher
आपले वाढणारे वय,सुरकुतलेला चेहरा,पांढरे होत जाणारे केस,शरीराची जाडी, सावळेपणा,कमी उंची,अशा अनेक गोष्टी तिला स्वतःलाच खटकत असतात.बाकी कोणी आपल्या बद्दल काही बोलो अथवा ना बोलो आपण स्वतःमध्ये कमी असणाऱ्या अनेक गोष्टींची यादीच तयार करतो.बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्यालाही कमकुवत करून ठेवतो.आपल्या बोलण्याची टोन लोकांना आवडणार नाही,चूक झाली तर लोक हसतील. म्हणून स्त्री स्वतःला पुढे नेण्यासाठी कचरते.अन् स्वतःलाच मागे खेचत राहते.
अशा वेळी मनाला एकच सांगा,'मी जशी आहे त्यात मी आनंदी आहे.माझ्या शरीराची ठेवण जशी आहे ती मला स्वीकारार्ह आहे. कारण माझे शरीर माझा मित्र आहे.' स्वतःतील नकारात्मकतेला बाजूला सारून दोन पावले पुढे जाऊन नवनिर्मिती करण्यास सज्ज व्हा.
Happiness is not something ready made, It comes from your own actions- Dalai Lama
डॉ. अरुणिमा सिन्हा सारखी महिला आपल्या विकलांगतेवर मात करून माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest ) पादाक्रांत करू शकते,मग आपले हात-पाय तर ठणठणीत आहेत.पुढे जाण्यासाठी आपल्या शरीरातून आवश्यक ती ऊर्जा आपल्याला मिळू शकते. तर मग नको त्या गोष्टींचा विचार करून आपण उगीचच आपले मन कमकुवत का करवे.आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे स्पर्धात्मक जगाशी सामना करण्यास आपण तत्परच होत नाही.
Dream It, Wish It, Do it.
आज कुटुंबाचे व्यवस्थापन करताना, मुलांचे पालकत्व सांभाळत, नात्यांच्या गराड्यात अनेक महिला स्वत:तले स्व:पण विसरून जातात.आशा-आकांक्षा मागे राहून जातात.आजारांकडे दुर्लक्ष केले जाते.नोकरी च्या नादात छंद जोपासणे राहून जाते.आणि मग उतारवयात गेल्यावर आपल्या बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या ही खंत वाटत राहते. पण तेव्हा वेळ आणि संधी दोन्हीही निघून गेलेल्या असतात.
सखींनो आजच ती वेळ आहे, आपल्यातील स्व:पणा जागृत करण्याची.आपल्या पंखांना भरारी देण्याची. जीवन एकदाच मिळते त्यावर मनापासून प्रेम करा.सगळं सांभाळत स्वतःचे एक पाऊल प्रगतीच्या दिशेने टाका.स्वतःवर प्रेम करत करत दुसऱ्यांनाही आनंद वाटा.
सांगून टाका स्वतःला "माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा सुंदर आहे,मी त्याला अधिक सुंदर बनवेल.मी प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी स्वतःवर प्रेम करून स्वतःचा स्वीकार करेल."
The most important thing is to enjoy your life- To be happy- Its all that matters- Hepburn.




0 Comments